spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Monsoon Update: मुसळधार पावसामुळे सायन परिसरात सखल भागात पाणी साचले

मुंबईला ५ दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात मान्सून बऱ्यापैकी सक्रिय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणारा पाऊस काल सोमवारी (४ जुलै) संध्याकाळपासून धो धो पडायला लागला. मध्यरात्री रात्री उशिरा धो धो पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईला ५ दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रात्री मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता.

मुंबईतील सायन परिसरात भरपूर पाणी साचले आहे. मध्यरात्रीपासून धो धो पडणाऱ्या पावसामुळे सायन परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईत पुढील ५ दिवस असाच मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामाखात्याने दिला आहे.

मुंबईत गेल्या 12 तासात 95.81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि एनडीआरएफच्या पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss