मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी 'ओबीसी' आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत जाहीर, दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी ‘ओबीसी’ आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुंबईत या आधी महापालिकेने 31 मे रोजी काढलेल्या आरक्षणाच्या सोडतीनुसार सर्वसाधारण 219 मधून ‘ओबीसी’चे आरक्षण जाहीर करण्यात आली. नऊ वाढीव प्रभागांमुळे ओबीसींसाठी यंदा 63 चे आरक्षण जाहीर होणार झाले आहेत. यातच अनेक दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे.

यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव आणि राखी जाधव यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लढण्यासाठी या दिग्गजांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा :

मुंबईसह ठाण्यात स्वाईन फ्लूचा फैलाव,आठवड्याभरात पाचपट रुग्णसंख्येत वाढ

कोर्टाच्या आदेशानंतर आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे व अमित शहा यांच्या भेटीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला

Exit mobile version