सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करणार २५० कोटींचा खर्च

पुढील दोन वर्षांत हा प्रयोग यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करणार २५० कोटींचा खर्च

वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपलब्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल विभागाकडून नवनवीन प्रयोग हे नेहमीच राबवण्यात येत असतात. पण मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका सांडपाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठी आता नवीन उपक्रम हातही घेणार आहे. कुलाबा येथे प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे.याकरता महापालिकेनं (BMC) निविदेची जाहिरात दिली आहे. मुंबई महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग असून यासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षांत हा प्रयोग यशस्वी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी सात धरणांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता आता सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य उपलब्ध करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य उपलब्ध व्हावे हा मुंबई महापालिकेचा (BMC) पहिलाच प्रयोग आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कुलाबा, नेव्ही नगर या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी सांगितले.

प्रायोगिक तत्वावर 12 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. जी कंपनी हा प्रोजेक्ट घेईल त्या कंपनीवर 15 वर्षे देखभालीची जबाबदारी असणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य उपलब्ध व्हावे यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. कंपनीला काम दिल्यानंतर पुढील 15 वर्षे त्या ट्रीटमेंट प्लाॅटची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी सर्वस्वी त्या संबंधित कंपनीची असणार आहे.

हे ही वाचा:

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे, म्हणत श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांवर केला पलटवार

काँग्रेसमध्ये पडणार फूट; अशोक चव्हाणांसोबत 15 आमदार सामील होणार भाजपमध्ये?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version