मुंबईत हाय अलर्ट; गेट वे ऑफ इंडिया आता पर्यटकांसाठी बंद

मुंबईत हाय अलर्ट; गेट वे ऑफ इंडिया आता पर्यटकांसाठी बंद

गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यानंतर महारष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ताबडतोब मुंबईसह इतर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवला. ठीकठिकाणी नकाबंदी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सध्या कमालीचे सावध झाले आहेत. मुंबईत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईच्या सुमद्रकिनाऱ्यालगत असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ पर्यटकांसाठी बंद आता करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात गणेश चतुर्थीला सुरुवात होणार आहे. यासाठी काही दिवस गेट वे ऑफ इंडिया इथे सामान्य नागरिकांना प्रवेश निषिद्ध असेल. ‘गेट वे ऑफ इंडिया’ नेमके किती दिवस बंद राहणार याबद्दल ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या निर्णयामुळे पोलिसांच्या हाती घातपाताच्या कटाविषयी काही सुगावे किंव्हा महत्त्वाची माहिती लागली आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु, पोलिसांकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मोठी बातमी: राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

गेट वे ऑफ इंडिया इथून सुटणाऱ्या बोटीचं तिकीट ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच आत सोडलं जात आहे. इतर कोणालाही तिथे जाण्याची परवानगी नाही. याठिकाणी २६/११ चा दहशतवादी हल्ल्या झाला होता. ज्याच्या मुंबईला झालेल्या जखमा अजूनही भरल्या नाही. पुन्हा असा घातपात होऊ नये म्हणून, यंत्रणांनी काही विचार करुनच हे बंद केलं असेल.

भारताबाहेरच्या नंबरवरून काही मेसेज मुंबई पोलिसांना पाठवण्यात येत आहे. या नंबरला ट्रॅक करण्यात येत असून यामुळे संपूर्ण पोलीस विभाग अलर्टवर आहे. मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहेत. धमकी देणाऱ्याने सांगितले होते की, भारतात स्फोट करण्याची जबाबदारी सहा लोकांवर आहे. या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस तपासाच्या कामाला लागले होते.

हेही वाचा : 

लिगर मध्ये ‘विजय देवरकोंडा’ चमकला पण, पुरी जगन्नाध चित्रपट चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला

Exit mobile version