आरे मेट्रो सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात; सुरक्षेसाठी पोलिस तैनात

राज्यसरकारने मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी दिलेल्या परवानगीमुळे आंदोलक झाले आक्रमक

आरे मेट्रो सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात; सुरक्षेसाठी पोलिस तैनात

पर्यावरणप्रेमींनी कडकडकडून केल्यावरही राज्यसरकारने आरे कॉलनीत मेट्रो कारशेडमध्ये बांधकामासाठी परवानगी दिल्यामुळे या बांधकामाविरुद्ध सध्या आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आरे परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. याशिवाय आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यात देखील सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारने परवानगी दिली असताना देखील आरे कॉलनीत मेट्रो कारशेडचे बांधकाम होऊ नये म्हणून आंदोलनकर्ते अधिक आक्रमक होऊन हा निर्णय रद्द व्हावा म्हणून आंदोलन करीत आहेत.

या निर्णयाच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींसह शिवसेना, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस असे विविध राजकीय पक्षीदेखील उतरले आहेत. या परिसरातील अतीसुरक्षेसाठी स्थनिक परिमंडळातील पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलातील जवानांनादेखील तैनात करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अनेकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजवण्यात आली आहे. त्या आतापर्यंत तरबेज सय्यद आणि जयेश भिसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

Exit mobile version