Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) भीषण अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत.

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) भीषण अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे (Mumbai News) येणाऱ्या मार्गावर झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात भरधाव येणाऱ्या आर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे.

अर्टिगा कार ढेकू गावच्या हद्दीत किलोमीटर ३७.०० याठिकाणी आली असता चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला किरकोळ जखमी झाली असून चार जण गंभीर जखमी झालेत.

कारमधील हे सर्व प्रवासी हे अर्टिगा ह्या चारचाकी वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतुकीवरही अल्पसा परिणाम झाला होता. जखमींना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालय येथे नेण्यात आले. त्यादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. सध्या चालक आणि इतर दोघाजणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र चार जणांचा जागीच जीव गेला होता. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला हटवली.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे :
१) अब्दुल रहमान खान,३२ वर्षे, घाटकोपर २) अनिल सुनिल सानप, ३) वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी ४) राहुल कुमार पांडे, वय-३० वर्षे, फ्लॅट न.-६०५, रिद्धेश्वर हौ. सो., कामोठे. नवी मुंबई ५) आशुतोष नवनाथ गांडेकर, २३ वर्षे, ५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई

अपघातातील जखमींची नावे :
१) मच्छिंद्र आंबोरे वय ३८ वर्ष(चालक) २) अमीरउल्ला चौधरी ३) दिपक खैराल

किरकोळ जखमी :
१) अस्फीया रईस चौधरी, २५ वर्षे. कुर्ला, मुंबई

हे ही वाचा :

मनसे कोण?; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल्यांनी लगावला टोला

स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही; मनसे करणार निषेध

Measles Disease : मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश; गोवर लसीकरणाच्या जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version