Mumbai Monsoon Update: मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिरा

माटुंगा आणि सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने लोकल धावत आहे. 

Mumbai Monsoon Update: मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिरा

मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिरा

मुंबई: जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य (Central Railway) आणि हार्बरवरील (hourbar Railway) लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. माटुंगा आणि सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने मध्य, हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने लोकल धावत आहे. दरम्यान कुर्ला, सायन स्टेशनच्या ट्रॅकवर ही पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर ही झाला आहे.
काल मध्यरात्रीपासूनच मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर सखल भागात पाणी साचल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. अनेक भागात पाण्याचा निचरा होत आहे. परंतू सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक खोळंबली आहे.  ट्रेन कुठेही थांबलेल्या नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी आमच्याकडून प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात येत आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
कोकण रेल्वेला ही जोरदार पावसाचा फटका
मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला (Kokan Railway) ही झालेला आहे. दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसचं इंजिन पावसामुळे खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. तुतारी एक्स्प्रेस (Tutari Express) कुडाळ (Kudal) स्थानकावर थांबून आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
Exit mobile version