Mumbai Traffic Updates : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; ‘पश्चिम द्रुतगती’साठी सहा पर्याय

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा (Andheri Connector Bridge) गोखले पूल (Gokhale Road Bridge) पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल आज दि. ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

Mumbai Traffic Updates : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; ‘पश्चिम द्रुतगती’साठी सहा पर्याय

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा (Andheri Connector Bridge) गोखले पूल (Gokhale Road Bridge) पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल आज दि. ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका (BMC) आणि मुंबई पोलिसांनी या पुलाची पाहणी केली होती. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम (Andheri East and Andheri West) दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात रहदारी असणाऱ्या मार्गांपैकी एक आहे.

मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी गोखले रोड पूल वाहतुकीसाठी बंद होत असल्याने मुंबई पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गाबाबत वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पर्यायी मार्गांमुळे वाहतुक कोंडीत भर पडणार असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. अंधेरी सबवे मार्ग हा गोखले रोड पुलावर असलेल्या क्षमते इतकी वाहतूक करण्यास असमर्थ असल्याचा सूर उमटत आहे. त्याशिवाय, विलेपार्ले स्थानकाजवळील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल लहान असून हा मार्ग रस्ते अरुंद गल्ल्यांतून जातात. या मार्गालगत शाळा, निवासी इमारती आहेत. त्यामुळे येथून वाहतूक वळवल्यास आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोखले पूल बंद झाल्यानंतर विलेपार्ले ते जोगेश्वरी दरम्यानची संपूर्ण वाहतूक कोलमडून पडेल, अशी भीती स्थानिकांना आहे.

हा गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०१८ मध्ये तो कोसळला. त्यानंतर २०१९ मध्ये सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. यावेळी सल्लागाराने गोखले पुलाच्या दुरुस्तीचा सल्ला दिला होता. त्यानुसार पालिकेने आपल्या हद्दीतील पुलाचे काम सुरू केले होते. पालिका हद्दीतील पुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील पूल धोकादायक असल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे एससीजी कन्सलटन्सी सर्व्हिस कंपनीकडून ऑक्टोबरमध्ये गोखले पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यामध्ये भेगा पडल्याने पूल धोकादायक बनला असल्याचे सांगत तो पाडण्याचा सल्ला देण्यात आला.

पर्यायी मार्ग कोणते?
पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी ६ पर्यायी मार्ग दिलेले आहेत.

– खार सबवे, खार
– मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ
– कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले
-अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई
– बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी
– मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव

हे ही वाचा :

Thackeray VS Shinde : सिल्लोडमध्ये आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांची धडाडणार तोफ

Bharat Jodo Yatra Maharashtra : ‘भारत जोडो यात्रेची’ महाराष्ट्रात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version