spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईत झालाय 10 हजार कोटीच्या टँकरच्या पाण्याचा घोटाळा,गैरव्यवहाराची होणार चौकशी

मुंबईतील टँकरच्या पाण्यात होत असलेल्या गैरव्यवहाराची अतिरिक्त आयुक्तां मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगर विकास खात्यातर्फे मंत्री उदय सामंत यांनी केली.

मुंबईतील टँकरच्या पाण्यात होत असलेल्या गैरव्यवहाराची अतिरिक्त आयुक्तां मार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगर विकास खात्यातर्फे मंत्री उदय सामंत यांनी केली.

भाजपाचे वांद्रे पश्चिमचे आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील पाण्याची लक्षवेधी सूचना उपस्थितीत केली होती. यावेळी आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत दोन वाँर्डमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24×7 पाण्याचा प्रकल्प राबविण्यात आला त्यापैकी एक मुलुंड आणि वांद्रे पश्चिमची निवड करण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प अयशस्वी ठरले. यासाठी 150 कोटी रूपये कंन्सल्टनला देण्यात आले. तर 250 कोटी कंत्राटदाराला म्हणजे जवळपास 500 कोटी रूपये खर्च करुन ही हा प्रकल्प महापालिका यशस्वी करु शकली नाही. उलट वांद्रे पश्चिम येथे जे पाणी मिळत होते त्या वेळेत आणि पाण्याच्या दाबात ही बदल करुन ते कमी केले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. हे वेळापत्रक बदला किमान 18 ते 20 तास पाणी देणार का? असा प्रश्न आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

तसेच मुंबईत गळतीमुळे 30% म्हणजे 500 दशलक्ष लिटर पाणी वाया जाते ते वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणार का? –
मुंबईत 1900 हजार विहिरी असून त्यामध्ये 12500 बोअरवेल आहेत. केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, एका बोअरवेल मधून 80 कोटीची चोरी टँकर मधून होते. याचा अर्थ मुंबईत 10 हजार कोटीचा पाण्याचा घोटाळा टँकर मार्फत केला जातो. याची चौकशी करणार का? असा प्रश्न आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी टँकर पाणी चोरीची चौकशी केली जाईल, पाणी वाया जाते त्याबद्दल सर्वंकष विचार केला जाईल, तर वांद्रे पश्चिम मधील पाण्याचे वेळापत्रक बदलण्याची सूचना पालिकेला केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतील आमदारांनी पाण्याबाबत विविध तक्रारी केल्या त्यामुळे याबाबत एक बैठक घेऊ, असे मंत्र्यांनी आश्वस्त केले.

हे ही वाचा : 

विराट आणि अनुष्काला मुंबई इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३ मध्ये पाहून चाहते घायाळ

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा, अजित पवार

मोठी बातमी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss