spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

११ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांमध्ये नाराजगी

सध्या वाढत्या तापमानामुळे लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुपारी घराबाहेर पडू नये असे वाटते. तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील दोन वातानुकूलित लोकलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सध्या वाढत्या तापमानामुळे लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुपारी घराबाहेर पडू नये असे वाटते. तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास पश्चिम रेल्वेवरील दोन वातानुकूलित लोकलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रवास सुखकर जावा यासाठी प्रवाशांनी अधिक पैसे मोजले खरे. पण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे हाल झाले. उन्हाच्या झळा बसू नये म्हणून प्रवाशांनी गारेगार प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित लोकलचे तिकीट काढले. मात्र, अचानकपणे वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने उन्हाच्या काहिलीने हैराण होण्याची वेळ प्रवाशांवर ओढवली.

एका वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने तब्बल ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर, दुसऱ्या लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने तिचे दरवाजे उघडे ठेवून चालवण्याची नामुष्की पश्चिम रेल्वे प्रशासनावर ओढवली. तसेच, या लोकलची आपत्कालीन साखळी खेचल्यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक बिघडले. मध्य रेल्वेवरील कळवा – मुंब्रा दरम्यान गुरुवारी वातानुकूलित लोकल अचानक थांबली. या लोकलचे दरवाजे उघडत नव्हते. तसेच शुक्रवारी सकाळी ७.१५ च्या विरार – चर्चगेट लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सकाळपासून पश्चिम रेल्वेवरील विरार – चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकल रद्द करण्यात आल्या. वातानुकूलित लोकलऐवजी साध्या लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारक आणि तिकीटधारक प्रवाशांना साध्या लोकलमधून प्रवास करावा लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रश्नांनाविरोधात नाराजगी दिसून येत आहे.

 

विरार–चर्चगेट वातानुकूलित लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांचा श्वास कोंडू लागला. या बिघाडामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, इतर लोकलचे वेळापत्रक कोलमडले. अखेरीस काही प्रवाशांनी सकाळी ९.२ वाजता मीरा रोड स्थानकांदरम्यान आपत्कालीन साखळी खेचून लोकल थांबवली. त्यानंतर, रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि वातानुकूलित यंत्रणा सुरू करण्यासाठी लोकलमध्ये दाखल झाले. मात्र, डब्यात गर्दी असल्याने ही यंत्रणा सुरू करण्यात अपयश येत होते. त्यामुळे दरवाजे उघडे ठेवून लोकल चर्चगेट दिशेने धावली. मात्र तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वे प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासनात अपयशी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई द्यावी. तसेच, एका दिवसाचे तिकिटाचे पैसे परत करावे. निष्काळजीपणाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद असे मत सांगितले आहे.

हे ही वाचा : 

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा आणखी एक अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss