Monday, September 30, 2024

Latest Posts

मोठी बातमी! पश्चिम रेल्वेवर ४ ऑक्टोबरपर्यंत १५० लोकल रद्द, मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं काम हाती

पश्चिम रेल्वे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी असून शनिवारपर्यंत (४ ऑक्टोबर) १५० लोकल रद्द होणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं काम हाती घेण्यात आलं असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. पश्चिम रेल्वेकडून याठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता. अजूनही १२८ तासांचं काम बाकी असल्यामुळे ४ ऑक्टोबरपर्यंत १५० लोकलफेऱ्या रद्द होणार आहेत. याशिवाय, राम मंदिर स्थानक मालाड स्थानकादरम्यान ३० किमी प्रतितास वेगाने लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या दिवसभरातील वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे.

रेल्वेच्या माहितीनुसार, सहाव्या लाईनच काम जसजसे पूर्ण होईळ तशी लोकलच्या वेगावरील मर्यादा हटवण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर सकाळच्या वेळी गोरेगाववरुन चार फास्ट लोकल चालवल्या जातात. या ब्लॉकच्या काळात लूप लाईन उपलब्ध नसल्यानं या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. मालाड स्थानकात ब्लॉकच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालेलं आहे. त्यामुळे मालाड स्थानकातील सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक ३ हा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ म्हणून ओळखले जातील. या सहाव्या लाईनच काम पूर्ण झाल्यावर मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र मागिका उपलब्ध होणार आहे. यामुळे लोकलवरील ताण कमी होऊन लोकलची संख्या वाढवण्याचा मार्गदेखील मोकळा होईल. पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार हि सहावी लाईन बोरिवली स्थानकापर्यंत डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत लोकल सेवेत सुधारणा होण्यास मदत होईल.

३० सप्टेंबरसाठी शेवटच्या लोकलचे वेळापत्रक असे असणार

  • चर्चगेट – विरार लोकल : चर्चगेटहून शेवटची लोकल रात्री ११.२७ वाजता सुटेल आणि विरारला १.१५ वाजता पोहोचेल.
  • चर्चगेट – अंधेरी लोकल: चर्चगेटहून अंधेरीसाठी १.०० वाजता लोकल सुटेल ती अंधेरीला १.३५ ला पोहोचेल.
  • बोरिवली – चर्चगेट लोकल: बोरिवलीहून रात्री १२.१० वाजता हि लोकल सुटेल ती १.१५ ला चर्चगेटला पोहोचेल.
  • गोरेगाव – सीएसएमटी लोकल : गोरेगावहून १२.०७ वाजता गोरेगावहून हि लोकल सुटेल तर १.०२ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
  • विरार – बोरिवली लोकल: हि अतिरिक्त लोकल चालवण्यात येणार असून विरारवरून ३.२५ ला सुटेल तर बोरिवलीत ४.०० वाजता पोहोचेल.
  • बोरिवली – चर्चगेट धीमी लोकल: अतिरिक्त लोकल बोरिवलीवरून ४.२५ ला सुटेल तर चर्चगेटला ५.३० ला पोहोचेल.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss