मुंबईमध्ये झाड कोसळून ३ जणांचा मृत्यू

मुंबईमधील मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या भायखळ्यात एका घरावर झाड कोसळले आहे

मुंबईमध्ये झाड कोसळून ३ जणांचा मृत्यू

मुंबईमधील मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईच्या भायखळ्यात एका घरावर झाड कोसळले आहे आणि या धक्कादायक घटनेमध्ये घरात झोपलेल्या ५-६ जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता जखमी व्यक्तीला स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर आता तातडीने उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यापासून झाड पडल्यामुळे आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये झाड पडून दोघांचा मृत्यू झाला आणि रात्री भायखळ्यात झाड पडून २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्री भायखळा इंदू ऑईल मिल कंपाऊंडमध्ये घरात पाच ते सहा जण झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास एक झाड खाली घरावर पडल्यामुळे रहमान खान या तरुणीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरामधील तरुण रिजवान खान हा गंभीर जखमी झाला आहे. सध्या रिजवान खानवर भायखळ्यामधील जे.जे रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पहाटेच्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कौशल महेंद्र जोशी वय वर्ष ३८ असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मुंबईमध्ये त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. ठाण्यामधील रॅम मारुती रोड या ठिकाणी मोठं झाड कोसळले आहे आणि त्यामुळे आता काही काळ या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमध्ये त्या ठिकाणी असलेल्या पुन्हा गाडगीळ या ज्वेलर्सच्या दुकानाचं किरकोळ नुकसान झालं आहे.

हे ही वाचा:

तुम्ही नवजात बाळाच्या आई आहात? तर पावसाळ्यात तुमच्या लहानग्यांची घ्या काळजी…

Smriti Irani यांचा Rahul Gandhi यांच्यावर मोठा आरोप, म्हणाल्या…

मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत तर एकाचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version