spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट

काल मुंबई विमानतळावर मोठी कारवाई ही करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ही कारवाई केली आहे.

काल मुंबई विमानतळावर मोठी कारवाई ही करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ही कारवाई केली आहे. अंतर्वस्त्रामध्ये लपवून आणलेले साडेचार कोटी रुपये मूल्याचे तब्बल ८ किलो सोने काळ मुंबई विमानतळावर पकडण्यात आली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक केली आहे. विशेष म्हणजे तस्करी केलेल्या सोन्याची पेस्ट करण्यात आली होती.

काल मुंबई विमानतळावर मोठी कारवाई ही करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणी डीआरआयने दोन प्रवाशांना अटक केली आहे. आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे. डीआरआयच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या टीमला दुबईहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे एक सिंडिकेट पेस्टच्या स्वरूपात सोन्याची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआय अधिकाऱ्यांचे पथक मुंबई विमानतळावर लक्ष ठेवून होते. या सर्व अनुषंगाने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. दुबईतून आलेल्या या विमानातून प्रवासी बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी या दोन प्रवाशांची चौकशी केली. मात्र, सुरुवातीला त्यांच्या तपासणीमध्ये काहीच आढळले नाही. मात्र, सखोल तपासणीमध्ये या दोघांनी त्यांच्या अंतर्वस्त्रामध्ये सोन्याची पेस्ट केलेली पाकिटे लपविल्याचे आढळून आले. सोने तस्करीची ही नवीनच पद्धती पाहण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रात्री उशिरा विमानतळावर दोन संशयित प्रवासी दिसू लागताच त्यांना थांबवण्यात आले. दोघांची कसून झडती घेतल्यानंतर पेस्ट स्वरूपात ८ किलो सोने जप्त करण्यात आले. सोन्याची किंमत अंदाजे साडेचार कोटी रुपये असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंडरवियरमध्ये लपवले गेले होते, ज्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. दोन्ही प्रवाशांना तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

जॅकलीन फर्नांडिसने केला आरोप, सुकेश चंद्रशेखर माझ्या भावनांशी खेळला

राष्ट्रवादीने केला अमृता फडणवीसांवर आरोप, सरकारी बंगल्यात बनवला रील…

पप्पू म्हणणं दुर्देवी, आरबीआयचे माजी गव्हर्नरकडून राहुल गांधी यांची स्तुती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss