मुंबईच्या मालाड बीचवर ५ मुलं बुडली, दोघांना वाचवलं तर…

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. तसेच या पावसाळी दिवसात बुडणाऱ्यांचे अपघात अधिक दिसून येतात. मुंबईच्या बँड स्टँड वर (Band stand) एका महिलेचा फोटो काढताना पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला,अश्या अनेक बातम्या दररोज समोर येत असतानाच आता आणखीन एक नवीन बातमी समोर आली आहे.

मुंबईच्या मालाड बीचवर ५ मुलं बुडली, दोघांना वाचवलं तर…

दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. तसेच या पावसाळी दिवसात बुडणाऱ्यांचे अपघात अधिक दिसून येतात. मुंबईच्या बँड स्टँड वर (Band stand) एका महिलेचा फोटो काढताना पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला,अश्या अनेक बातम्या दररोज समोर येत असतानाच आता आणखीन एक नवीन बातमी समोर आली आहे. ही बातमी मुंबईतील मलाड या ठिकाणाची असून त्याजागी तब्बल ३ जणांनी आपला जीव गमावला आहे.

मुंबईच्या मालाड मार्व समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे तर तीन मुले अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मारवे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती.त्यांनी त्यावेळी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले पाण्यात बुडू (drown) लागली. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली (drown). यामधील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.

कृष्णा जितेंद्र हरिजन (१६ वर्षे ) आणि अंकुश भारत शिवरे (१३ वर्ष ) या दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. त्यातील शुभम राजकुमार जयस्वाल (१२ वर्ष) निखिल साजिद कायमकूर (१३ वर्ष) अजय जितेंद्र हरिजन (१२ वर्ष) ही तीन मुले बेपत्ता असून कोस्टगार्डचे (Coastguard) जवान, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे जीव रक्षक आणि कोस्टगार्डचे (Coastguard) जवान बेपत्ता झालेल्या मुलांचा समुद्रात शोध घेत आहेत.या पावसाळी दिवसात अनेकदा स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमवून बसतात.

हे ही वाचा:

Mumbai सह राज्यातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर

अशोक मामांबद्दल खुद्द निवेदिता सराफ यांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version