मुंबईत ग्रँटरोडमध्ये माथेफिरूकडून ५ जणांवर चाकूने हल्ला

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील ग्रँडरोडमध्ये एका माथेफिरूने आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे.

मुंबईत ग्रँटरोडमध्ये माथेफिरूकडून ५ जणांवर चाकूने हल्ला

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईमधील ग्रँडरोडमध्ये एका माथेफिरूने आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्लेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे आणि एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लेखोरांचा नाव चेतन गाला असं आहे. अचानकपणे या व्याक्तीने आधी आपल्या शेजारांवर हल्ला केला आणि या चाकू हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे

मुंबईमधील ग्रँडरोड परिसरामध्ये ही घटना घडली आहे.ग्रँडरोडचा हा परिसर अत्यंत गर्दीचा आणि गड्बडीचा हा परिसर आहे. या परिसरामध्ये या व्यक्तीने आजूबाजूच्या लोकांवर हल्ला केला आहे. त्या व्यक्तीच्या हातामध्ये चाकू होता. कौटुंबिक तणावातून हा चाकू हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील ग्रँडरोड भागांधील पार्वती मेन्शन या चाळीमध्ये ही घटना घडली आहे.

डी बी मार्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने चाळीत राहणाऱ्या इतर लोकांवर चाकूने सपासप वार केले आहेत भरदिवसा ही घटना घडली आहे. जखमींना तातडीने नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या उपचाराच्या दरम्यान २ जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे.

हे ही वाचा : 

National Park मध्ये दोन महिन्यात दोन हजारांहून अधिक झोपड्यांना आगी Govt is cruel with hutmens

मुंबईच्या लाखो लिटर पाण्याची ठाण्यात नासाडी, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version