मुंबईतल्या जुहू चौपाटीवर ६ जण बुडाले तर स्थानिक नागरिकाने एकाला वाचवले

मुंबईमध्ये अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत त्यामधील विशेषतः मुंबईचा प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी एक दुःखद घटना समोर आली आहे.

मुंबईतल्या जुहू चौपाटीवर ६ जण बुडाले तर स्थानिक नागरिकाने एकाला वाचवले

मुंबईमध्ये अनेक समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत त्यामधील विशेषतः मुंबईचा प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी एक दुःखद घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर संध्याकाळच्या वेळेला सहा जण समुद्रामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न लावता आल्यामुळे हे सहाजण बुडाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. यामध्ये एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. परंतु पाच जण अजूनही गायब आहेत आणि त्यामुळे नौदल व अग्निशमन दलामार्फत शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

साम टीव्हीने दिलेल्या माहिती नुसार मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबई बरोबरच कोकण किनार पट्टीवर लाटांचे तांडव पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे असा इशारा मुंबई महानगर पालिकेने दिला आहे. संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान बरेच तरुण पर्यटक फिरण्यासाठी त्याचबरोबर काही तरुण जुहू कोळीवाडा येथे समुद्रात उतरले आणि समुद्रामध्ये तुफान असल्यामुळे ते उतरू शकले नाही.

जुहू चौपाटीवरच्या काही स्थानिक नागरिकांनी त्यांना असा सल्ला दिला होता. परंतु स्थानिकांची नजर चुकवून हे तरुण समुद्रामध्ये गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या तरुणांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सह जण बुडाले होते. त्यामधील एका स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेची संपूर्ण माहिती मिळताच अग्निशमन दलासह नौदलाला पाचारण करण्यात आले. सध्या गायब असलेल्या पाच जणांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलिस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

लवकरच गाड्यांचा वेग वाढणार, Nitin Gadkari यांनी दिली माहिती!

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

तुम्ही Dahi Toast कधी ट्राय केला आहे का? नसेल तर ही लज्जतदार रेसिपी फक्त तुमच्या साठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version