८ जण एकाच स्कूटीवर ; लहान मुलांच्या जीवाशी खेळ

आता तर अगदी हद्दच झाली. दोन नाही तीन नाही तर चक्क ८ जण एकाच दुचाकीवर (2 wheeler ) स्वार होतानाचा विडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे.

८ जण एकाच स्कूटीवर ; लहान मुलांच्या जीवाशी खेळ

भारतातील रस्ता सुरक्षेच्या कायद्यानुसार, दुचाकीवर (2 wheeler )फक्त दोन जणांना बसण्याची परवानगी आहे, ज्यात चालक आणि दुचाकीस्वार (bike rider) यांचा समावेश आहे. दुचाकीवर (2 wheeler ) तिहेरी स्वारी करणे (triple seat) मोटार वाहन कायदा, १९८८ च्या तरतुदींचे उल्लंघन केलं जात आहे. हे रूल्स (rules)आजच्या युगात कोणीही पाळत नाही. अनेकदा या सुरक्षा नियमांचे नागरिकांद्वारे उल्लंघन केले जाते. स्कूटीवर दोन जणांना बसण्याची परवानगी असते तरीही अनेकदा आपण या दुचाक्यांवर तीन जणांना स्वार होताना पाहिले असेल पण आता तर अगदी हद्दच झाली. दोन नाही तीन नाही तर चक्क ८ जण एकाच दुचाकीवर (2 wheeler ) स्वार होतानाचा विडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे.

भारतात शेकडो रस्ते अपघात हे होत असतात. याचे मूळ कारण म्हणजेच रस्ते नियमांचे उल्लंघन करणे. देशाचा नागरिक या नात्याने ह्यूमन राईट्सद्वारे (human rights)प्रत्येक नागरिकाने आपल्या देशातील नियमांचे पालन करणे अनिवार्य असते.पण आजकाल कुणीही याकडे लक्ष देत नाही. त्यातच आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्कूटीवर ७ लहान मूल व एक दुचाकीस्वार रस्त्यावर प्रवास करताना दिसत आहे. या घटनेतून दुचाकीस्वार (bike rider) स्वतःसह मुलांच्या जिवाशीही खेळत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये , एक व्यक्ती स्कूटीवरून (scooty)तब्बल सात मुलांना एकत्र घेऊन जात आहे. त्यात स्कूटीच्या मागील बाजूस एक मुलगा उभा आहे आणि तीन मुले मध्यभागी बसली आहेत; तर स्कूटीच्या डाव्या बाजूला एक मूल धोकादायक अवस्थेत लटकले आहे. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीने हेल्मेटदेखील घातलेले नाही. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.हा व्हीडिओ ट्विटरवर (twitter) शेअर करण्यात आलेला असून ६३ हजारांहून अधिक वेळा तो पाहण्यात आला आहे. हा जीवघेणा प्रवास करत असल्याचा विडिओ पाहून अनेक जणांनी त्यांना बेजबाबदार आणि बेफिकीर असल्याचं म्हटले आहे.

 

हे ही वाचा:

City of Dreams साठी प्रिया बापटने केला मोठा त्याग! खुद्द अभिनेत्रीने केली खंत व्यक्त केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा खरंच केली का ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी Ball tempering? पाकिस्तानचा माजी खेळाडू Basit Ali चे आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version