Marine Line जवळच्या वसतीगृहात १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

सध्या संपूर्ण राज्यासह देशभरात अनेक गुन्हेगारीच्या गोष्टी समोर येत आहेत. राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे.

Marine Line जवळच्या वसतीगृहात १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

सध्या संपूर्ण राज्यासह देशभरात अनेक गुन्हेगारीच्या गोष्टी समोर येत आहेत. राजधानी दिल्लीतून पुन्हा एकदा हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील साक्षी हत्याकांडाची (Sakshi Murder Case) घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही दुहेरी हत्याकांडाची घटना आहे. काल दिनांक ६ जून मंगळवार रोजी, मुंबईतील चर्चगेट परिसरात ही घटना घडली आहे.

चर्चगेट परिसरात मुलींच्या वसतिगृहात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या दोन्ही दृष्टीकोनातून तपास करत असले तरी. त्याचबरोबर या वसतिगृहाच्या चौकीदाराचा मृतदेहही सापडला आहे. तर मृत तरुणीचे वय १८ ते २० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावरून सापडला आहे. मरीन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून जीआरपीने एडीआर नोंदवला आहे. मुलींच्या वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर राहत होती, ती अकोल्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार वसतिगृहातील लोकांना दुपारी चारच्या सुमारास समजला. सध्या पोलीस या प्रकरणाचा दोन बाजूंनी तपास करत आहेत.

ड्राईव्ह गर्ल्स हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या आरोपी वॉचमनचा पोलीस शोध घेत होते, मात्र त्याचा मृतदेहही पोलिसांनी जप्त केला आहे. चर्नी रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर चौकीदाराचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ३५ वर्षीय ओमप्रकाश कनोजिया असे या चौकीदाराचे नाव आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस तपास करत आहेत. तर गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगी कॅम्पसच्या चौथ्या मजल्यावर राहायची. सायंकाळी चारच्या सुमारास वसतिगृहातील लोकांना ही घटना समजली. तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version