spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करत म्हणाले… परमेश्वराने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली…

Uddhav Thackeray Birthday : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह संपूर्ण राज्यभरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मोतोश्री परिसरात तुफान बॅनरबाजी करण्यात आली आहे. आणि कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे त्यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

शिंदे गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास कदम यांचाही आज वाढदिवस आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धवजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना आणखी आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा देतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घरीच बसून राहिले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू नये. असा मुख्यमंत्री होऊ नये. नाही तर महाराष्ट्र विकासात आणखी मागे जाईल, असा चिमटा रामदास कदम यांनी काढला.

तसेच यावेळी माध्यमांशी बोलत असताना रामदास कदम म्हणाले आहेत की, वाढदिवसाच्या दिवशी राजकारण करणं योग्य नाही. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती प्रत्येक निर्णय एकत्र बसून घेील, असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना परमेश्वराने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. काम करण्याची संधी होती. या संधीचं सोनं करता आलं असतं. पण त्यांना कोणताही निर्णय घेता आला नाही. मंत्रालयात जात नव्हते. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे नुकसानच होईल. मी त्यांना आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच ते पुन्हा मुख्यमंत्री होऊच नये, महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये याच्या देखील शुभेच्छा देतो, असं रामदास कदम म्हणाले. तर यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते आरोप करतात. आजच्या दिवशी कुणाला वाईट न बोलणं अधिक चांगलं होईल, असं मला वाटतं. पण संजय राऊतला आता कोणी गांभीर्याने घेत नाही. ते वारंवार वायफळ बोलत असतात, अशी टीका त्यांनी केली.

Uddhav Thakeray Birthday: रश्मी-उद्धव ठाकरे यांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले? जाणून घ्या हा प्रेमप्रवास…

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे “धर्मवीर-२” चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले; निर्मात्यांचा अनोखा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss