मुंबईमध्ये मोठी दुर्घटना टाळली, क्रेनची लोकलला धडक

मुंबईमध्ये मोठी दुर्घटना टाळली, क्रेनची लोकलला धडक

आताच्या घडीची मोठी मिळत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री नायगाव (Naigaon) फलाट क्रमांक एकवर उद्वाहकासाठी स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी रुळाला समांतर काही अंतरावर क्रेन उभी करण्यात आली होती. ब्लॉक घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते. त्याच वेळी अचानक रुळाजवळच उभ्या असलेल्या तृतीयपंथीयाने क्रेनवर जोरदार दगफेक (Heavy stone pelting on the crane) केली. त्यामुळे चालकाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत (Injury to right thumb) झाली आणि त्याला क्रेन नियंत्रित करता आली नाही. त्याचवेळी मध्यरात्री ००.५५ वाजता एक उपनगरीय विरार लोकल डाऊन दिशेला येऊन नायगाव स्थानकात प्रवेश करत होती.

शुक्रवारी मध्यरात्री नायगाव फलाट क्रमांक एकवर उद्वाहकासाठी स्टीलचे खांब उभारण्यासाठी ब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी रुळाला समांतर काही अंतरावर क्रेन उभी करण्यात आली होती. ब्लॉक घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते. त्याच वेळी अचानक रुळाजवळच उभ्या असलेल्या तृतीयपंथीयाने क्रेनवर जोरदार दगफेक केली. त्यामुळे चालकाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला क्रेन नियंत्रित करता आली नाही. त्याचवेळी मध्यरात्री ००.५५ वाजता एक उपनगरीय विरार लोकल डाऊन दिशेला येऊन नायगाव स्थानकात प्रवेश करत होती.

क्रेन चालकाला नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे क्रेन नियंत्रित करणे कठीण झाले आणि क्रेनचे हुक लोकलच्या काचेला धडकला. त्यांमुळे समोरील काचा फुटल्या आणि मोटरमनच्या डोक्याला मार लागला. दरम्यान, मोटरमनला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. या घटनेनंतर लोकल रिकामी करून विरार कारशेडमध्ये नेण्यात आली.

हे ही वाचा:

कंगना रणौतने ट्विटवर पठाणची स्तुती करताच, चाहत्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी !: नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version