Ghatkopar Fire News घाटकोपरमधील पारख रुग्णालयालाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग

Ghatkopar Fire News घाटकोपरमधील पारख रुग्णालयालाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग

घाटकोपर रेल्वे स्थानका जवळ असलेल्या पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला आज (१७ डिसेंबर) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. पोरशी देढिया असे आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून आणखी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयातील (Ghatkopar) रुग्णांना धुराचा त्रास होऊ नये यामुळे त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमदलाच्या काही गाड्या घनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा : 

Mahavikas Aghadi Mahamorcha : महाविकास आघाडीच्या आंदोनातील काही खास फोटो

स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात गंभीर आजार असलेले व्हेंटिलेटरवचे रुग्ण उपचार घेत आहेत. काहींना चालताही येत नाही, असेही रुग्ण आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी जवानांना कष्ट घ्यावे लागत आहेत. वरच्या माळ्यावरील काही रुग्ण खिडक्यांमधून हात काढून खालच्या लोकांना वाचवण्यासाठी गयावया करीत आहेत. सगळ्याच रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

या लफग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Exit mobile version