Mumbai Fire News मुंबई लोअर परळ भागातील अविग्नॉन पार्क इमारतीच्या ३५व्या मजल्याला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

Mumbai Fire News मुंबई लोअर परळ भागातील अविग्नॉन पार्क इमारतीच्या ३५व्या मजल्याला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मुंबईतील (Mumbai) वन अविघ्न इमारतीच्या (One Avighna Fire News) ३५व्या मजल्याला आग लागल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आगीचे प्रचंड लोट येत असल्याचं घबराट निर्माण झाली आहे. अग्निशमन दलाकडून (Mumbai Fire News Today) आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या वर्षी २०२१ मध्ये याच इमारतीला भीषण आग लागली होती. वर्षभरानंतर आता पुन्हा एकदा याच इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यानं हाहाकार माजलाय.

हेही वाचा : 

Indian Air Force exercise भारत-चीन संघर्षादरम्यान आजपासून लढाऊ विमानांची LAC वर गर्जना, हवाई दलाचा युद्धाभ्यास सुरु

वन अविघ्न ही इमारत एकूण ६० मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही या परिसरात आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या (Currey Road Railway Station) अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Worli Bandh महापुरुषांबाबत अवमानास्पद विधानानंतर, पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळी परिसरातही आज बंदची हाक

अग्नीशमन दलाचे जवान (Firefighters) इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी युद्धपाथळीवर प्रयत्न करत आहेत. या इमरातीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अगदी लहान असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पण आगीपर्यंत पोहोचण्यात अग्नीशमन दलाला जिकरीचं होतं आहे. आगीत आतापर्यंत जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Sumeet Pusavale बाळूमामा ‘फेम’ सुमित पुसावळे अडकले लग्न बंधनात, पहा लग्नाचे फोटो

Exit mobile version