Nitin Gadkari यांनी केली मोठी घोषणा; रस्ते अपघातांना तोड म्हणून राज्यात येणार नवी कार्यप्रणाली

Nitin Gadkari यांनी केली मोठी घोषणा; रस्ते अपघातांना तोड म्हणून राज्यात येणार नवी कार्यप्रणाली

अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुणे हिट अँड रन प्रकरण असेल, वरळी हिट अँड रन प्रकरण असेल यांसारखी अनेक प्रकारणे गेल्या काही दिवसापासून समोर येत आहेत. या प्रकरणामुळे सामान्य नागरिकाने कास जगावं हा प्रश्न उपस्थित होत असतानाच, आता रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी नवी कार्यप्रणाली आणली आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांना काही प्रमाणात टाळा करण्यात येऊ शकतो. देशभरात सातत्याने छोटे मोठे अपघात घडत असतात. त्यातच सध्या पावसाळ्यात रस्ते अपघात (Road Accident) होण्याची शक्यता जास्त असते. मात्र अनेकदा अपघातामध्ये वेळीच उपचार व मदत न मिळाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत जाते. हे प्रकरण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार (Central Government) अपघातग्रस्त पीडितांच्या मदतीसाठी सज्ज झाले असून एक योजना सुरु केली आहे. त्या योजनेदरम्यान पीडितांना उपचारादरम्यान कॅशलेस ट्रीटमेंट (Cashless Treatment Plan) देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पॉलिसी तयार केली आहे. ‘पायलट प्रोजेक्ट’ (Pilot Project)  असे या पॉलिसीचे नाव असून याद्वारे अपघातग्रस्तांना, जखमी झालेल्या प्रवाशांना कॅशलेस ट्रीटमेंट देण्याचा प्लान तयार करण्यात आला आहे. तसेच सर्वप्रथम या पायलट प्रोजेक्टचं चंदीगढ आणि आसाममध्ये ट्रायल सुरु करण्यात येणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.

नक्की काय आहे ही योजना ?

या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांवर भारत पंतप्रधान जन आरोग्य अंतर्गत लिस्टेड रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. तसेच अपघात झाल्याच्या तारखेपासून पुढे सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत ट्रॉमा आणि पॉलीट्रॉमा केयरसंबंधी आरोग्य लाभाचे पॅकेज दिले जाणार आहेत. ही योजना आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयअंतर्गत एनएचए, स्थानिक पोलीस, लिस्टेड रुग्णालय, राज्य आरोग्य एजन्सी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केद्र आणि सामान्य विमा परिषदेच्या समन्वयाने पार पडणार आहे. तसेच याबाबत उत्पन्नाचे मार्ग आणि त्यावरील उपाय हे केंद्रीय मोटर वाहन नियम २०२२ अंतर्गत देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

Paris Olympics 2024 :Manu Bhaker यांची अंतिम फेरीत धडक ; भारताची यशशिखराकडे होणार घोडदौड सुरु

Railway Mega Block Update : रविवारी घराबाहेर पडताय तर त्याआधी ‘हे’ वाचा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version