spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Local मुंबईची लाईफलाईन लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा, हायकोर्टात जनहित याचिका

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेनमध्ये (Mumbai local train) ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा ठेवावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ॲड. के. पी. पुरुषोत्तम नायर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. लोकलमध्ये ज्याप्रमाणे कर्करोग आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा आरक्षित केला आहे, त्याप्रमाणे ज्येष्ठ प्रवाशांनादेखील स्वतंत्र डबा असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

गाजर पासून बनवा पौष्ठिक ‘गाजर वडी’

ज्येष्ठ नागरिकांसाठी उपनगरीय लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याच्या मागणीसंदर्भात ९ ऑगस्ट २०१९ रोजी आपण तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनाही निवेदन दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) सार्वजनिक तक्रार कक्षानं त्याची एक प्रत रेल्वे प्रशासनाकडेही पाठवली होती. त्यावर २ जानेवारी २०२० रोजी रेल्वेनं प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करणे शक्य नसल्याचं कळवलेल आहे. त्यामुळे आपण याप्रकरणी ही याचिका दाखल केल्याचंही नायर यांनी याचिकेत नमूद केलेलं आहे.

नायर हे उच्च न्यायालयात सेवेत होते आणि आता ज्येष्ठ नागरिक आहेत. ते नियमितपणे वांद्रे ते चर्चगेट रेल्वे (Western railway) प्रवास करतात. या मागणीसाठी त्यांनी रेल्वे विभागाला पत्रही दिले होते; मात्र गर्दीच्या वेळी असा स्वतंत्र डबा देता येणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दररोज हजारो ज्येष्ठ नागरिक रेल्वे (Central railway) प्रवास करतात.

winter traveling tips हिवाळयात फिरायला जायचा विचार करताय, तर प्रवासात या’ गोष्टी सोबत ठेवा

ऐनगर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना लोकलमधून प्रवास करणेही अशक्य होतं, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या राखीव जागांचा लाभ घेता येत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. उपनगरीय लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीही किमान २५ जागा आरक्षित ठेवाव्यात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेत सहज प्रवेश आणि बाहेर पडता येईल, असेही याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

winter traveling tips हिवाळयात फिरायला जायचा विचार करताय, तर प्रवासात या’ गोष्टी सोबत ठेवा

Latest Posts

Don't Miss