‘या’ Social Media Influencer सोबत घडला धक्कादायक प्रकार

अंकिता वालावलकर ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. अंकिता सर्वत्र कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) म्हणून प्रसिद्ध आहे.

अंकिता वालावलकर ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. अंकिता सर्वत्र कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. अंकिताचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच प्रसिद्ध आहेत. तिच्या व्हिडिओंचे अनेक चाहते आहेत. अंकिताचे फोटो आणि व्हिडीओ बरेच प्रसिद्ध आहे. अंकिता युट्युबवर (Youtube) देखील प्रसिद्ध आहे. युट्युबवर अंकिताचा चॅनेल असून ती युट्युबवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अंकिता बरेच व्हिडीओ युट्युबवर पोस्ट करत असते. नुकतंच अंकिताने तिच्या यूट्यूबच्या चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे अंकिताने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. हा प्रकार अंकिता सोबत हा भयंकर प्रकार मुंबईमधील KEM रुग्णालयात घडला आहे. म्हणूनच सर्वत्र अंकिता चर्चेत आहे. अंकिताने हा अनुभव व्हिडिओद्वारे सांगितला असून सध्या हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे.

या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे अंकिताने मुंबईमधील केएम रुग्णालयात तिच्यासोबत घडलेला प्रकार उघडकीस आणला आहे. अंकिताचा मित्र याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे अंकिताच्या मित्राला म्हणजेच किरण चव्हाण याला सिंधुदुर्गातून थेट मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. अंकिताच्या मित्राला १४ जून रोजी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील संपूर्ण दिवस एकही डॉक्टर त्याची तपासणी करण्यास फिरकला नाही. केईएम रुग्णालयात त्याच्यावर कोणतेही उपचार झाले नाही. या गोष्टीची माहिती अंकिताला मिळताच ताबडतोब तिने रुग्णालयात विचारपूस करण्यास धाव घेतली.

अंकिताला शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट प्रमुख अमेय खोपकर यांच्याकडे धाव घ्यावी लागली. अंकिताने अमेय खोपकर यांच्याशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली. त्यांनतर अमेय खोपकर यांनी सूत्र हलवले आणि तातडीने अंकिताच्या मित्रावर उपचार सुरु झाले. तसेच या सगळ्या प्रकारणात हॉस्पिटलची स्टिटीस्कॅनची मशील बंद होती. म्हणून अंकिताच्या मित्राला बाहेरून सिटीस्कॅन करावं लागल.

हे ही वाचा:

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी करते ड्रग्जचे सेवन?

मुंबईमध्ये ईडीचे १५ ठिकाणी छापे, संजय राऊत यांच्या मित्रावर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version