Andheri तील धक्कादायक घटना आली समोर, गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू तर…

सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यभर अनेक घटना या घडतच आहेत. नुकतीच मुंबईतील अंधेरीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.

Andheri तील धक्कादायक घटना आली समोर, गावठी दारु प्यायल्याने एकाचा मृत्यू तर…

सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यभर अनेक घटना या घडतच आहेत. नुकतीच मुंबईतील अंधेरीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गावठी दारु (Liquor) प्यायल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर इतर चार कामगारांची प्रकृती गंभीर आहे. सध्या या कामगारांवर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

गावठी दारू पिणे कामगारांच्या जीवावर बेतलं आहे. ही गावठी दारु प्यायलेल्या या चारही जणांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दावठी दारु पिऊन विषबाधा झाल्याने एकाचा मृत्यू तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील समजत आहे. अंधेरीतील पंप हाऊस परिसरात एका घरात पाच कामगार राहत होते. तर मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाची त्यांना सुट्टी होती. ड्राय डे असूनही चारही कामगार गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामधून गावठी पिऊन घरी आले आणि त्यानंतर झोपून गेले. मात्र हे चौघे कामगार घरात १५ ऑगस्टच्या संध्याकाळी झोपल्यानंतर काल दिवसभर त्यांनी दरवाजा उघडला नाही.

यानंतर शेजारच्या लोकांनी पोलिसांना कॉल केला. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन दार उघडलं. त्यावेळी एक कामगार मृत्यूमुखी पडल्याचं निदर्शनास आलं. तर चार कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचं दिसलं. हे कामगार १८ ते २० वर्षे वयोगटातले असल्याचं समोर येत आहे. यानंतर एमआयडीसी पोलिसांनी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. सध्या या चौघांवर रुग्णालयाची आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा: 

आता घरबसल्या सोप्या पद्धतीने काढा Online Passport, जाणून घ्या सविस्तर…

हिमाचल-उत्तराखंडमध्ये देण्यात आला रेड अलर्ट, जाणून घ्या सविस्तर

BIG BOSS OTT winner एल्विश यादवबद्दल आलिया म्हणाली …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version