spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईत धक्कादायक घटना ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. रोज कुठेना ना कुठेतरी महिलांवरील अत्याचारांबद्दल बातमी समोर येते. मुंबईमधील लोअर परेल (Lower Parel) भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार (Gang rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक (Six accused arrested) केली आहे.

मुंबईत एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोअर परळमध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे सहा आरोपींमधील तिघे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात (juvenile detention center) पाठवण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ तारखेला लोअर पऱळमध्ये १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींमधील एक अल्पवयीन तरुण पीडितेचा मित्र आहे. पीडितेला घेऊन तो आपल्या मित्राच्या घरी गेला होता. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

तरुणीने कुटुंबीयांना सगळी घटना सांगितल्यानंतर त्यांनी एन एम जोशी (NM Joshi) पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. यातील तिघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर इतर तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने (Court) त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून पुरावे गोळा करत आहेत.

 ही वाचा : 

सबरीमाला मंदिरातून परतणाऱ्या भाविकांची गाडी ४० फूट खोल दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू

अवतार २ ( Avatar:The Way of Water) चित्रपटाने केली २०० कोटीची कमाई

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss