शिवाजी पार्कवरील जन आक्रोश मोर्चात, भाजप नेत्यांचे शक्ति प्रदर्शन

शिवाजी पार्कवरील जन आक्रोश मोर्चात, भाजप नेत्यांचे शक्ति प्रदर्शन

धर्मांतर आणि लव जिहाद यांच्या विरोधात हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा (Hindu Jan Aakrosh Morcha) मुंबईत काढण्यात आला आहे. लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आला आहे.मुंबईतील शिवाजी पार्क (shivaji park) येथून हा मोर्चा सुरु होणार आहे. आणि आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे. तर या मोर्च्यामध्ये भाजप नेत्यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे.

आज देशात तसेच राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, श्रद्धा वालकरचे हत्याकांड आणि धर्मांतर कायदा यासाठी सकल हिंदू समाजातर्फे हा जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरा लव्हजिहादच्या बऱ्याच घटना घडल्याच्या बातम्या ऐकण्यात आल्या आहेत. यामुळेच आता हिंदु समाजाकडून लव जिहादच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथून हिंदू जनआक्रोश मोर्चाला आता सुरुवात झाली आहे. तर या मोर्च्यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे. या मोर्च्यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar) , किरीट सोमय्या (Kirit Somaiya), आशिष शेलार (Ashish Shelar), केशव उपाध्ये ( Keshav Upadhye), चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि निलेश राणे (Nilesh Rane) हे भाजपचे नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या मोर्चाला महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील अनेक भाजपचे नेते या मोर्चाला उपस्थित आहेत.

हिंदू समाजाकडून काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाची सुरुवात हि मुंबईतील शिवाजी पार्क मैदानापासून होणार आहे. तर हा मोर्चा पुढे कामगार मैदान मार्गे प्रभादेवी येथे पोहचणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गैर प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पुरेपूर तयारी केली आहे. त्याच बरोबर रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान देखील तैनात ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींची चीनच्या राजदूताबरोबर बैठक… , एस जयशंकर यांनी केला चिनी घुसखोरीवर मोठा खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version