महात्मा गांधीं जयंती निमित्त राज ठाकरे यांनी शेअर केली एक खास पोस्ट

आज संपूर्ण देशभरात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.

महात्मा गांधीं जयंती निमित्त राज ठाकरे यांनी शेअर केली एक खास पोस्ट

आज संपूर्ण देशभरात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी (Prime Minister of India Narend Modi) काही मोठ्या राजकीय नेत्यांसह राज भवनामध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. तसेच काही नेत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशीच एक पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी शेअर केली आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतीलही किंवा नसतीलही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन” असे राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये व्यक्त केले आहे.

महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की फक्त भारतातच नव्हे, तर जवळपास तीन खंडांतील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं, ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही”, विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले. कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षांतच मागे पडलेले दिसले. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले. पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. याला कारण चर्चिल यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं. ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं ‘ असे देखील त्यांनी या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

Exit mobile version