मुंबईमध्ये एका संशयित दहशतवाद्याला अटक

एनआयएकडून (NIA) दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणे (National Investigation Agency) कडून माहिती देण्यात आली आहे कि पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतले आहे.

मुंबईमध्ये एका संशयित दहशतवाद्याला अटक

एनआयएकडून (NIA) दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणे (National Investigation Agency) कडून माहिती देण्यात आली आहे कि पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतले आहे. या संशयित दहशतावाद्याचे नाव सरफराज मेमन (Sarfaraz Memon) असे आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईमध्ये एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती राष्ट्रीय तपस यंत्रणेने दिली आहे आणि इतर यंत्रणांना हि माहिती पुरवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे NIA ने इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. सरफराज मेमनची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली आहे.

हा संशयित दहशतवादी चीन (China) आणि पाकिस्तानमधून (Pakistan) ट्रेंडिंग घेऊन भारतात आल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिली आहे. या माहितीच्या आधारे राष्ट्रीय तपस यंत्रणेने पोलिसांना सतर्क राहण्याचे आव्हान देण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच अनेक यंत्रणांकडून तपास सुरु झाला आहे आणि त्यामध्ये यश आले असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल (E-Mail) पाठवण्यात आला आहे.

तपास यंत्रणेकडून तपास सुरु झाला आहे.संबंधित संशयित इसम सरफराजला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यात येईल.महाराष्ट्र एटीएस संशयित सरफराज मेमनची चौकशी करणार आहेत. मुंबई मध्ये फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरचे राहणारी आहे. या व्यक्तीने चीन,हॉंगकॉंग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेंडिंग घेतली आहे असे माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. रस्त्री तपास यंत्रणेकडून पोलिसांना या व्यक्तीची कागदपत्रे सुद्धा पाठवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबत संपर्क साधून सविस्तर माहिती देण्यात आली आहे आणि इंदूर पोलिसांनी संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version