उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेने घातला गोंधळ, नेम प्लेट काढून फेकली…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेने घातला गोंधळ, नेम प्लेट काढून फेकली…

Unknown woman attack on Devendra Fadnavis office : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मंत्रालयात तगडी सुरक्षाव्यवस्था असतानाही ही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई मंत्रालयात असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आज (२७ सप्टेंबर) एका महिलेने गोंधळ घातला. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नेम प्लेट काढून खाली फेकली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचा चेहरा दिसत आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेचा शोध सुरू केला आहे. एका अनोळखी महिलेने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड सुरू केली आणि मंत्रालयातून बाहेर पडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न घेताच मंत्रालयात दाखल झाली होती. ही महिला सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात दाखल झाली.

पोलीस आयुक्तांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ती महिला आधी आत गेली होती, काही वेळाने ती मंत्रालयाच्या गेटमधून बाहेर पडू लागली, नंतर गेटवर पोहोचल्यावर तिला काहीतरी आठवले आणि ती पुन्हा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गेली आणि तिथे गोंधळ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर केला, घटनेनंतर महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी मंत्रालय परिसरात पोलिसांची फारशी उपस्थिती नव्हती. त्यामुळे या महिलेची दखल न घेता सहज सचिवालयाच्या गेटमधून आत प्रवेश केला.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version