मुंबईत कारमधून १० महिन्याच्या चिमुकलीला बाहेर फेकून महिलेचा केला विनयभंग

मुंबईत कारमधून १० महिन्याच्या चिमुकलीला बाहेर फेकून महिलेचा केला विनयभंग

मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) महामार्गावरील विरार (Virar) हद्दीत एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा चालू कारमध्ये विनयभंग (Car molestation) करून, तिच्या १० महिन्यांच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिले असल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून, या घटनेत १० महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजणाच्या सुमारास विरार फाटा येथे घडली आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून वसई-विरार महापालिकेच्या (Vasai-Virar Municipal Corporation) तुळिंज रुग्णालयात (Tullinge Hospital) तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेत भादंवि कलम ३०२, ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मांडवी पोलिस ठाण्याचे (Mandvi Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Senior Police Inspector० प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे.

पीडित महिला ही आपल्या १० महिन्यांच्या मुलीला घेऊन नालासोपारा पेल्हार फाटा येथून इको कारमध्ये बसून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर कारमधील लोकांनी तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिची छेड काढली. त्यानंतर तिच्या १० महिन्यांच्या बाळाला बाहेर फेकले. त्याला वाचवण्यासाठी महिलेनेही गाडीतून बाहेर उडी मारली. त्यात ती जखमी झाली, तर तिच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी त्याच इको कारमध्ये पीडित महिला आणि मुलीला घेऊन तुळिंज येथील रुग्णालयात दाखल केले, पण मुलीचा मृत्यू झाला होता. इको कारचालक विजय कुशवाह याला कारसह मांडवी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला वाडा तालुक्यातील पिंपलास गावाची राहणारी आहे. तिचा पती नालासोपारातील एका कंपनीत कामाला आहे. शनिवारी (१० डिसेंबर ) दुपारच्या सुमारास पीडिता पतीला भेटण्यासाठी जात होती. त्यासाठी तिने इको कारला (जीजे १५,पीजे ११३७) हात करून त्यात बसली. ती नालासोपारा येथून वाडाकडे जात असताना कारमधील नरधमांनी विरार फाटा येथे गाडी आल्यावर महिलेची छेड काढली व तिच्या मुलीला कारमधून बाहेर फेकले. मुलीला वाचवण्यासाठी महिलेनेही धावत्या कारमधून उडी घेतली. यामध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर नालासोपारा पूर्वेच्या वसई विरार पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्देवी घटनेत दहा महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : 

Virat-Anushka Anniversary आधी भांडण मग प्रेम, अशी सुरू झाली अनुष्का-विराटची रंजक प्रेमकहाणी

नरेंद्र मोदींचा महारष्ट्रामधल्या विरोधकांना मारला टोला

Youtuber Armaan Malik युट्युबर अरमान मलिकच्या दोन बायका एकाच वेळी गरोदर, बेबी बंपचा फोटो शेअर करत केला खुलासा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version