Watch Video मुंबईत कोरियन युट्यूबर तरुणीची लाईव्ह व्हिडीओदरम्यान छेडछाड,आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Watch Video मुंबईत कोरियन युट्यूबर तरुणीची लाईव्ह व्हिडीओदरम्यान छेडछाड,आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मुंबई येथील खार परिसरात धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. एका युट्युबरचा लाईव्ह व्हीडिओदरम्यान विनयभंग करण्यात आला. ही माहिती युट्युबरच्या फॉलोअरने मुंबई पोलिसांना दिली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral video) व्हायरल होत आहे.

दक्षिण कोरियाची युट्यूबर महिला रात्रीच्या वर्दळीच्या वेळी मुंबईत फिरत होती. खार भागात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना होती. पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, परंतू या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे म्हटले आहे. ही महिला लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा : 

Gujarat Election 2022 पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान सुरू , तब्बल ७८८ उमेदवारांचं भवितव्य जनतेच्या हाती

नेमकं काय घडलं?

ही घटना दोन दिवसांपूर्वीची असून, ही तरुणी प्रसिद्ध युट्यूबर (Young Korean YouTuber) आहे. भारतातील विविध ठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असते. तशीच एक लाईव्हा स्ट्रिमिंग करण्यासाठी काल ती खारच्या रोड क्रमांक ५ वर आली होती. त्या ठिकाणी ती लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना ती दोन तरुणांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी या दोन तरुणांनी तिला ओढण्याचा, तिचे चुंबन घेण्याचा, तिला गाडीवर बळजबरीने बसवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं लाईव्ह सुरू होत. ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचं आहे सोडण्याची ऑफर दिली. मात्र तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

Petrol Diesel Price Today वर्ष अखेरीस देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरांतील इंधन दरातला बदल

या प्रकरणी दोघांनाही खार पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबीन शेख(१९) आणि मोहम्मद अन्सारी (२०) अशी दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत.

Exit mobile version