केलेल्या कृत्याचा जराही पश्चाताप नाही असे आरोपी मनोजने पोलिसांना ठामपणे सांगितले

अंगावर काटा आणि कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी घटना मुंबईमध्ये ७ जूनला रात्री मीरारोडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अवघा देश चकित झाला आहे.

केलेल्या कृत्याचा जराही पश्चाताप नाही असे आरोपी मनोजने पोलिसांना ठामपणे सांगितले

अंगावर काटा आणि कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा अशी घटना मुंबईमध्ये ७ जूनला रात्री मीरारोडमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर अवघा देश चकित झाला आहे. मिरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची विकृत मनोवृत्तीची घटना उघडकीस आली. या भामट्याला नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आरोपीला १६ जूनपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीच्या जबाबामधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

आरोपी मनोज साने याने पोलिसांना सांगितले आहे की, त्यांची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली नाही तर त्या महिलेने आत्महत्या केली आहे. त्यांनतर आरोपी घाबरल्यामुळे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी असे पॉल उचलण्यात आले असे आरोपी मनोज सानेने पोलिसांना सांगितले. त्यांनतर आरोपीने सांगितले की मृत महिला आरोपीला मामा म्हणत होती असे दावा आरोपीने केले आहे. आरोपी मनोज साने हा HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर असे समोर आले आहे की, आरोपीमध्ये आणि मृत महिलेमध्ये तणाव होता असेही आरोप म्हणाला. पोलिसांचे म्हणणे आहे की, मनोज साने हत्येच्या आरोपांखाली अटकेत होता. त्यामुळे तो सातत्याने वेगवेगळे दावे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. मेडिकल रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

आरोप मनोज सानेने पोलिसांना जबाब दिला आहे की, लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची त्याने हत्या केलीच नाही. ३ जून रोजी सरस्वतीने आत्महत्या केली होती. त्यानंतर आरोप मनोज घाबरला आणि पोलीस त्यालाच सरस्वतीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरतील असे त्याला वाटते. त्यामुळे त्याने सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असे तो आरोपी म्हणाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आधी मृतदेहाचे तुकडे केले आणि त्यानंतर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले. सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतःही आत्महत्या करणार होता. तसेच, त्यानं जे केलं त्याबाबत त्याला जरासाही पश्चाताप नाही, असंही आरोपी मनोज ठामपणे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version