spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CSMT च्या अतिरिक्त मार्गिकांचा रस्ता होणार मोकळा ; Bycullaआणि Sandhurst Road ला मात्र द्यावे लागणार बलिदान

हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे.

लोकल म्हंटल की मुंबई आणि मुंबई म्हंटल की लोकल असा उच्चर आला नाही तरच नवल. लोकल म्हणजे मुंबईचा जीव, श्वास आहे असं म्हणू शकतो. लोकल शिवाय मुंबईतील चाकरमानी आपले काम करूच शकणार नाही. कमी किंमतीत, कमी वेळेत परवडणारा असा हा लोकलचा प्रवास आहे. याच लोकल च्या मार्गात आता अडथळे निर्माण होत असतात. तरीही हि लोकल हे सर्व अडथळे बाजूला सारून पावसापाण्यात, उन्हातान्हातही आपले कार्य निस्सीम पार पडत असते. त्याचमुळे मुंबई २४ तास कार्यरत असते. अशाच उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गात येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत.याचा फटका हा हर्बल (Harbour Railway) आणि मध्य रेल्वेला (Central Railway)  बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. नव्या आराखड्यानुसार पाचवी आणि सहावी मार्गिका टाकायची असल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकातच संपेल. तर यापुढे मध्य रेल्वेमार्गावरील फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, या दोन्ही प्रस्तांवाची व्यवहार्यता तपासली जात आहे.

लोकल वाहतुकीत बदल होण्याची नेमकी करणे काय ?

एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग हा २००८ मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आता तयारी सुरु झाली आहे.

सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होईल. यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येईल. भायखळा स्थानकातून जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे याचा वापर नव्या मार्गिकांकरिता करण्यासाठी जलद मार्गावरील फलाट तोडून त्या ठिकाणी नवी मार्गिका उभारणे शक्य आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे. यामुळे हार्बरने सीएसएमटीपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे शक्य आहे.

हे ही वाचा:

T20 series : Rinku आणि Surya यांच्या कामगिरीने केले Team India ला विजयी

EWS अंतर्गत मराठा उमेदवारांच्या भरती प्रक्रियांना मिळाली तात्पुरती स्थगिती

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss