spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरेंनी यांनी केली एकनाथ शिंदेंवर टीका

मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले.‘स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके’ हेच सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले.

मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले.‘स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके’ हेच सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईकरांचे पैसे या सरकारने जाहिरातबाजीत घातल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला. ‘मुंबईत जिथे कधी पावसाचे पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचूनही मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या तक्रारी म्हणजे बदनामी वाटत आहे. हे सरकार निर्लज्ज आहे, ’’ अशा शब्दांत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. पाणी साचल्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष केले आणि नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. त्यावर मात्र, पावसाचे स्वागत करा, पाणी तुंबल्याची तक्रार काय करता त्यासाठी वेळ असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.

त्याला आदित्य यांनी पत्रकार परिषदेत जोरदार उत्तर दिले. आदित्य म्हणाले, ‘‘पावसाळ्यात मुख्यमंत्री नाल्यात उतरले आणि सफाईचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र, नालेसफाई झालीच नाही. तरीही, मुंबईच्या तक्रारींकडे मुख्यमंत्री बोट दाखवत आहेत. हा निर्लज्जपणा असून, हा प्रकार आतापर्यंत पाहिला नाही. याआधी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे सगळीकडे फिरून कामांची पाहणी करीत होते. पावसाळ्यापूर्वीची कामे करीत होते. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री रस्त्यांच्या घोटाळ्यात अडकले आहेत. तरी देखील मुंबईसाठी एकही बैठक घेतली नाही.

यापूर्वी मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण व्हायची. परंतु, आता नको तिथे रस्त्यांची खोदाई केली असून, लोकांची गैरसोय होत असतानाही मिंधे गटातील काही नेता पुढे येत नाही. ठाकरे सरकार पाडण्यासाठी जेवढ्या बैठका घेतल्या, पण मुंबईकरांच्या कामासाठी एक बैठक घेतली असती, तर ही वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी शिंदे यांना काढला. मुंबईत जिथे कधी पावसाचे पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचूनही मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या तक्रारी म्हणजे बदनामी वाटत आहे. हे सरकार निर्लज्ज आहे, अशा शब्दांत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.

हे ही वाचा:

महाराष्ट्रामध्ये पुढील ४८ तासात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मान्सूनने लावली हजेरी; हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss