२० तासांच्या मिरवणुकीनंतर Lalbaugcha Raja गिरगाव चौपाटीवर दाखल, विसर्जनासाठी भाविकांचा जनसागर लोटला

“ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची अशा निनादात काल दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजा नुकताच गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे

२० तासांच्या मिरवणुकीनंतर Lalbaugcha Raja गिरगाव चौपाटीवर दाखल, विसर्जनासाठी भाविकांचा जनसागर लोटला

“ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची अशा निनादात काल दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजा नुकताच गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे . गेल्या २० तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असून आता थोड्याच वेळात राजाचे विसर्जन होईल. दरम्यान, समुद्राला भरती नसल्याने अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपतीही रांगेत आहेत. त्यामुळे समुद्राला भरती आल्यानंतर लालबागच्या राजासह सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन होईल.

लालबागच्या राजाचे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते. लालबागच्या राजाचे विसर्जन ९ वाजता होण्याची शक्यता आहे. समुद्राला ओहोटी आल्याने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्याने अनेक भाविक लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी येत असतात. तसंच, इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही या मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे या राजासाठी गर्दी वाढत जाते. गर्दीत सहभागी होता न येणारे अनेक भाविक गिरगाव चौपाटीवरच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी थांबले आहेत. लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. येथे आता आरती होऊन बाप्पाचं मोठ्या भक्तीभावाने विसर्जन केलं जाईल.

दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाहेर पडले. बाप्पाच्या विसर्जनानिमित्त पावसानेही काल हजेरी लावली. पावसाच्या आगमनातही बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते. गेल्या २० तासांपासून सुरू असलेल्या मिरवणुकीतील उत्साह अद्यापही कमी झालेला नाही.

हे ही वाचा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अनंत चतुर्दशीचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version