spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahim Majar, राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांचा पाडवा मेळावा हा पार पडला.

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांचा पाडवा मेळावा हा पार पडला. या मेळाव्यात अनेक गौप्यस्फोट हे केले आहेत. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा एक व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली. अखेर राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर आज माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली.

माहिम (Mahim) समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) अखेर हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं (Mumbai Palika) अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अखेर राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर माहिम दर्ग्याच्या मागे असणाऱ्या वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली.

काल राज ठाकरे यांनी इशारा दिला आणि त्यांच्या इशाऱ्यानंतर रातोरात प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली. याठिकाणची जागा महापालिका नव्हे तर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्यारित असल्याने ही कारवाई त्यांच्याकडून केली जाईल असं मनपाने सांगितले. गुरुवारी सकाळी सकाळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी जागेचे मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर या जागेचे कुठे नोंद आहे का याची पडताळणी करण्यात आली. मात्र ही मजार ६०० वर्ष जुनी असल्याची नोंद असल्याचं माहिती समोर येत आहे. परंतु सदर जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचं प्रशासनाला आढळून आले.

हे ही वाचा : 

RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र

जर राज ठाकरे जनतेच्या मनात मुख्यमंत्री आहेत तर मग मी जनतेच्या मनात भारताचा पंतप्रधान, जितेंद्र आव्हाड

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss