Measles Outbreak : मुंबई, ठाण्यानंतर भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा मोठ्या प्रमाणात शिरकाव; राज्य सरकारकडून तातडीची बैठक

Measles Outbreak : मुंबई, ठाण्यानंतर भिवंडी, नाशिक, मालेगावात गोवरचा मोठ्या प्रमाणात शिरकाव; राज्य सरकारकडून तातडीची बैठक

मुंबई मध्ये सोमवारी २४ नवे गोवरची रूग्ण समोर आले आहेत. यामध्ये १ वर्षीय मुलीचा गोवर मुळे संशयित मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. १ जानेवारीपासून मुंबई मध्ये गोवरची रूग्णसंख्या २०८ वर पोहचली आहे. अशी माहिती बीएमसीने दिली आहे. मुंबईत गोवर मुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा ८ पर्यंत पोहचला आहे. गोवंडी देवनार भागात सहा नवे रूग्ण समोर आले आहेत. तर कुर्ला मध्ये ५ नवे रूग्ण आहेत. मागील ४ दिवसापासून ठाण्यातील मुंब्रा, कौसा या भागात ठाणे पालिकेकडून गोवर लसीकरणसंदर्भात सर्वेक्षण केले जात आहे.

हेही वाचा : 

उद्धव ठाकरेंच्या संपत्ती चौकशीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

१२ मुलांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. भिवंडी, मालेगाव आणि मुंबई गोवरच्या आजाराचे हॉटस्पॉट झाले आहेत. भिवंडीत ४४ जणांना गोवरची लागण झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर भिवंडीत संशयित रुग्णांचा आकडा २७१ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिकातही चार संशयित रुग्णांची भर पडली आहे. मालेगावातही रुग्ण संख्या ४४ वर पोहोचली आहे, तर काही दिवसांत मुंबई प्रमाणेच महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्येही गोवरचे रूग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये लहान मुलांप्रमाणेच आता प्रौढ देखील गोवरच्या लक्षणांनी बाधित झालेले पहायला मिळाले आहेत त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेमध्ये अजून वाढ झाली आहे.

टी वाय बी कॉममध्ये शिकणाऱ्या मुलाचा हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल

गोवरचा उद्रेक थांबवायचा असेल तर यासाठी एकच मोठे हत्यार आहे ते म्हणजे लसीकरण आणि त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व्हेक्षण करत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात लसीकरणाचे अतिरिक्त सत्र घेत गोवरचा उद्रेक कमी करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. मात्र, त्याला गरज आहे ती लसीकरणाला साथ देत त्याचा वेग कायम ठेवण्याची.

Refinery Project : ठाकरे – फडणवीसांच्या चुकीनं राज्याचं होतयं रोज ५८ कोटींचं नुकसान

Exit mobile version