राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मनसैनिकानीं पहिला मुलुंड टोलनाका पेटवला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टोलबाबतच्या (Toll) इशाऱ्यानंतर राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाले आहेत.

राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मनसैनिकानीं पहिला मुलुंड टोलनाका पेटवला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टोलबाबतच्या (Toll) इशाऱ्यानंतर राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर संध्याकाळी मनसैनिकांनी (MNS supporters) पहिला टोलनाका पेटवला आहे. मुलुंड टोलनाका मनसैनिकांनी पेटवून दिला आहे. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून ती पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच आज सकाळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला मुलुंड टोल नाका पेटवून दिला.

मागील काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. पण आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर रस्त्यावर उतरुन टोलनाक्यांची पाहणी केली. त्यानंतर अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर जाऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली. दुपारी अविनाश जाधव यांनी टोलनाक्याची पाहणी केल्यानंतर संध्याकाळी मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवून दिला. मनसैनिकांनी जुन्या मु्ंबई-पुणे हायवेवर (Mumbai – Pune highway) असलेल्या शेडूंग टोल नाका (Shedung Toll) येथे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मनसेने शेडूंग टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांना विनाटोल सोडण्याची मागणी केली त्यानंतर वाहनांना विना टोल भरता सोडण्यात आले.

महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असे म्हंटले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले ‘ देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू ‘ असे राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा: 

विद्या बालनचा एका लहान मुलीबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छत्रपती संभाजीनगर मधून ७०० वाहनांचा ताफा जाणार मनोज जरांगे यांच्या सभेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version