बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादीचा ‘पत्ता’ बदलणार! Ajit Pawar यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार हे आता आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहेत. आज मंगळवार, दिनांक ४ जुलै रोजी अजित पवार यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादीचा ‘पत्ता’ बदलणार! Ajit Pawar यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

दिनांक २ जुलै रोजी राज्याच्या राजकाणार अनेक मोठ्या घडामोडी या झाल्या आहेत. एक वर्षांपूर्वी देखील असाच गोंधळ हा राज्यात दिसून येत होता. आता पुन्हा सर्व तेच चित्र दिसून येत आहे. एक वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बंड करत बाहेर निघाले. त्यांनतर आता एक वर्षाने अजित पवार हे राष्ट्रवादीमधून बंड करून बाहेर निघाले आहेत. राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता अजित पवार हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री आहेत.एकीकडे अजित पवार यांची साथ मिळाली म्हणून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. तसेच शरद पवार हे पक्षप्रमुख असले तरी पक्षाचे बहुतांश आमदार त्यांच्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार हे आता आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहेत. आज मंगळवार, दिनांक ४ जुलै रोजी अजित पवार यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे हे नवीन कार्यालय मुंबईतील मंत्रालयाजवळ असेल. त्याला राष्ट्रवादी भवन असे नाव देण्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे कार्यालय सध्या मुंबईतील बलार्ड एस्टेट येथे आहे. अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांचा असा दावा आहे की, त्यांनी पक्ष फोडून गट स्थापन केला नसून, तो पक्षच आहे. मात्र या दाव्यावर नव्या कार्यालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, अजित पवार यांनी अद्याप नवीन कार्यालयाबाबत कोणतेही निवेदन दिलेले नाही. पक्षाच्या नवीन कार्यालयाबाहेरील एक व्हिडिओही जारी केला आहे. त्याच्या बाहेर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – महाराष्ट्र प्रदेश’ असे लिहिले आहे. महाराष्ट्र शासनाची कार्यालये थोड्या अंतरावर आहेत.

अजित पवार रविवारी २ जुलै रोजी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनीही शपथ घेतली. त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ अशी मोठी नावे होती. यासोबतच काही दिवसांपूर्वी पक्षाचे कार्याध्यक्ष बनलेले प्रफुल्ल पटेल हेही अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होणार्‍या पक्षाच्या नेत्यांना डाकू म्हटले होते. सोमवारी बंडखोरांवर कारवाई सुरू झाली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय देण्यात आला. दुसरीकडे, मंत्री झालेल्या ९ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी पक्षाने विधानसभा अध्यक्षांना पत्रही पाठवले आहे.

अजित छावणीनेही शरद पवार यांच्या गटाने केलेल्या कारवाईला कृतीतून उत्तर दिले. प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

हे ही वाचा:

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version