spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेना नाव आणि चिन्हापाठोपाठ आता ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिक देखील गायब

दि. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं.

दि. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकारणात राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला होता. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि चिन्ह पूर्णपणे निसटून गेलं आहे. आणि आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे आणि या हँडलवर क्लिक केलं की, सध्या रॉक अँड रोल असं नाव दिसत आहे. या हँडलला दोन लोक फॉलो करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्या धिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल केले आहेत. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव ShivSenaUBT_ असं ठेवण्यात आलं. शिवसेना कम्युनिकेशन या हँडलचंही ब्ल्यू टिक गेलं असून त्या हँडलचं नाव आता ShivsenaUBTComm असं ठेवण्यात आलं आहे. तसेच ठाकरे गटाकडून त्यांच्या वेबसाईट मध्ये देखील मोठा बदल हा करण्यात आला आहे. सध्या शिवसेनेची वेबसाईट बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट वेबसाईटच्या नावातही बदल करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवसेना नावावरील दावा संपुष्टात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या नावाने त्यांच्याकडे असलेल्या ट्विटर हँडलची नावं बदलून ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यानुसार केलं. शिवसेनेच्या हँडलमध्येच बदल झाल्याने ट्विटरच्या नियमानुसार हे ब्ल्यू टिक गेलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला ब्ल्यू टिकसाठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल.

हे ही वाचा : 

निवडणूक आयोगाच्या निकालांनंतर ठाकरे गटाकडून संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss