Thursday, July 4, 2024

Latest Posts

सभागृहातील शिवीगाळ प्रकरणावर Sushma Andhare यांचं सुचक ट्विट

या दोन्ही नेत्यांच्या वादावर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत निषेध नोंदवला.पण काल झालेल्या या प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी याबाबत सुचक ट्विट केले आहे. 

२७ तारखेपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला(Monsoon Session 2024) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र अशातच काल १ जुलै रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेचे पडसाद थेट विधानपरिषदेत उमटताना दिसून आले. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे(Ambadas danve) आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि त्या वादाचं रुपांतर शिवराळ भाषेत झालं. या दोन्ही नेत्यांच्या वादावर आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत निषेध नोंदवला.पण काल झालेल्या या प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी याबाबत सुचक ट्विट केले आहे. 

लोकसभेत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) भाजप (BJP) आणि आरएसएसवर जोरदार टीका केला आणि ते म्हणाले की, “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन थेट विधावपरिषदेत भाजपकडून गदारोळ करण्यात आला. आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी राहुल गांधी यांना “इटलीला पाठवून द्या”असं वक्तव्य केलं. लोकसभेतील मुद्यावर बोलून विधानपरिषदेतील कामकाजात व्यत्यय आणण्याची गरज नसल्याचे अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी म्हणताच प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी दानवे यांच्याकडे हातवारे केले. त्यावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवीगाळ केल्याने सभागृहात वादंग पेटले  आणि विरोधकांकडून थेट निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. “शिवीगाळ करणं अयोग्य असे शब्द वापरणाऱ्यांना निलंबन करायला हवं.”असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला सुषमा अंधारे यांनी ट्विट करत महाजनांचा समाचार घेतला आहे. 

“शिवीगाळ करणे योग्य नाही. असे अपशब्द वापरणाऱ्याचे निलंबन करायला हवे हे शहाणपण गिरीश महाजनांना तेव्हा का सुचले नाही जेव्हा रमेश बिधूडी नावाचा खासदार दानिश आली बद्दल अत्यंत अभद्र भाषेत बोलत होता. किंवा संजय शिरसाट अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसं महिलांबद्दल गलिच्छ भाषेत बोलत होती.” असं सूचक शब्दात ट्विट करत त्यांनी गिरीश महाजनांना जाब विचारला आहे. 

दरम्यान, अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी म्हणताच प्रसाद लाड(Prasad Lad) यांचे वाद आणि लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्यावरुन अजून किती राजकारणं पेटतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss