Tuesday, October 1, 2024

Latest Posts

अमित शाहांचे मिशन मुंबई, दोन दिवसीय दौऱ्यात मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा

राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता लोकसभा निवडणुका नंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका या पार पडल्या आणि आता लोकसभा निवडणुका नंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांकडे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनिती आखली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. गेल्या २ आठवड्यात शाह दुसऱ्यांदा राज्यात येत आहे. त्यातच आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह हे मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेलाही भेट देणार आहेत. संघ प्रचारकांसोबत शाह चर्चा करणार आहेत. मागील आठवड्यात शाह यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेतला. आज ते नवी मुंबईतल्या वाशी इथं कोकण, ठाणे, पालघर विभागातील नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि संघ यांच्यातील समन्वयासाठी विधानसभा संयोजक नेमले गेलेत. त्यामुळे शाह यांच्या या दौऱ्यात ते संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करतील.

मुंबईतील बैठकीनंतर अमित शाह हे संध्याकाळी ४.३० च्या सुमारास नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये बैठक घेणार आहेत. यावेळी ते ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमित शाह यांचे मुंबईत स्वागत अशा आशयाचे बॅनर सध्या मुंबईत झळकताना दिसत आहेत. अमित शाह यांनी आज दुपारी १.३० वाजता मुंबईतील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या दोन्हीही बैठकींनंतर आज रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला स्वत: अमित शाह उपस्थितीत असणार आहे. यावेळी अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी अमित शाह हे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss