मुंबईतील घटनेवरून अमित ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद असून तेथे राहणारी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली होती.

मुंबईतील घटनेवरून अमित ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद असून तेथे राहणारी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मिळाली होती. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील ही घटना असून, तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनविसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रसंगामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर बड्या नेत्यांकडून त्यासंदर्भात लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.अमित ठाकरे यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे. ज्या सावित्रीमाईंमुळे भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, त्यांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार आणिखून झाल्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. तसेच हि मुंबई मध्ये घडलेली गोष्ट अतिशय दयनीय आणि आणि काळिमा फासणारी आहे.

अमित ठाकरे यांनी लिहिलं आहे की, आज हजारो तरुणी आपल्या शहर आणि गावापासून दूर मुंबई-पुण्यासारख्या शहरात शिक्षण अथवा नोकरीसाठी वसतिगृहात राहत आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे अशा तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल, याची कल्पना करवत नाही. राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी आता तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्यावा आणि राज्यातील सर्व महिला हॉस्टेल्सचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ करावे.”

हे ही वाचा:

मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना, अजित पवार

कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version