मुंबईमधील एअर हॉस्टेलची राहत्या घरी गळा चिरून हत्या…

मुंबई (Mumbai) मधील पवई (Powai) परिसरत एक खबळजनक गोष्ट घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

मुंबईमधील एअर हॉस्टेलची राहत्या घरी गळा चिरून हत्या…

मुंबई (Mumbai) मधील पवई (Powai) परिसरत एक खबळजनक गोष्ट घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पवई येथे राहणाऱ्या २३ वर्षीय एअर हॉस्टेलची (Air Hostel) हत्या झाल्याची घटना घडली आहे. मरोळ महाराव रोड येथे एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रुपल ओग्रे (Rupal Ogre) राहत होती. ती मूळची छत्तीसगढची (Chhattisgarh) असून एअर एअर इंडियामध्ये (Air India) प्रशिक्षणासाठी मुंबईमध्ये आली होती. तिच्या सोबत तिची बहीण आणि तिचा मित्र हे दोघे राहत होते. तिच्या राहत्या घरी मध्यरात्री तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. तिच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या नुसार अज्ञात व्यक्तीवर ३०२ अन्वेये गुन्हा दाखल करण्यात आला.

रुपल ओग्रे हिने कुटुंबियांचे कॉल न उचलल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मुंबई मधील तिच्या एका मित्राला संपर्क साधला आणि विचारपूस करण्यासाठी सांगितली. जेव्हा तरुणीचे कुटुंबीय तिकडे पोचले तेव्हा फ्लॅट आतून बंद असल्यामुळे त्यांनी बेल वाजवली पण बेलवाजवली असता कोणीही आतून प्रतिसाद दिला नाही. दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलवण्यात आले. त्यानंतर घराच्या डुप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा खोलण्यात आला. पोलीस दरवाजा खोलून आतमध्ये गेल्यानंतर त्यांना रुपल गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. तिला लगेच राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले पण तिला तिथे मृत घोषित करण्यात आले. नंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात दाखल केला.

पोलीस तपासादरम्यान रुपलच्या हत्या प्रकरणात इमारतीमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या घटनेची चौकशी नंतर नेमकी कोणती हत्या केली आहे हे समोर येईल. रुपल सोबत तिची बहीण आणि मित्र राहत होते पण आठ दिवसापूर्वी गेले होते. रुपल ओग्रे घरात एकटीच असताना तिची हत्या करण्यात आली.

हे ही वाचा:

नांदेडमधील मोर्चात सहभागी झालेल्या आमदारांना आंदोलकांनी अक्षरशः हुसकावून लावले…

इस्रो शास्त्रज्ञ N Valarmathi यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रात एकूण दहा नवीन पोलीस ठाण्याच्या जागांसाठी वेगाने हालचाली सुरू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version