Bombay High Court च्या कारकीर्दीचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस, न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी”- Dr. Justice D. Y. Chandrachud

Bombay High Court च्या कारकीर्दीचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस, न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी”- Dr. Justice D. Y. Chandrachud

वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित नवीन उच्च न्यायालयाच्या संकुलाचे भूमिपूजन सरन्यायाधीश डॉ.चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायालयाच्या कामाचे स्वरूप आणि आवाका हा प्रचंड वाढल्याने न्यायालयाची जागा आणि सुविधा यांची आवश्यकता वाढली आहे. नवीन आव्हाने, नवीन उद्दिष्टे आणि न्यायपालिकेचा भविष्यात्मक दृष्टिकोन, त्यातील बदल याचा विचार करता नवीन इमारत ही काळाची गरज आहे. नवीन संगणकीय बदल, डिजिटायझेशन, पेपरलेस कोर्ट, न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” या सगळ्या बाबींचा विचार करता नवीन इमारत मोठी आणि अद्ययावत बांधणे, हे सगळ्यांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळेच आजचा दिवस हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कारकीर्दीचा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरणार असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड (D.Y.Chandrachud) यांनी व्यक्त केले.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वांद्रे येथील ही नवीन इमारत पुढील १०० वर्षासाठी पक्षकार, वकील मंडळी, न्यायाधिशांकरिता योगदान देणारी असेल. मुंबई उच्च न्यायालयाचे काम १४ ऑगस्ट १८६२ रोजी अपोलो बंदर येथून सुरू झाले. त्यानंतर १७ वर्षांनी सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. तेव्हापासून ही इमारत न्यायालयाच्या कारभाराचा भार सांभाळत आहे, असे कौतुकोद्गार काढत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, तब्बल दीडशे वर्षाच्या इतिहासात मुंबई उच्च न्यायालयाने अनेक स्थित्यंतरे आणि बदल पाहिले आहेत. या न्यायालयाचा इतिहास आणि लौकिक फारच दैदीप्यमान व प्रेरणादायी आहे. या न्यायालयाने आपल्या देशाला अनेक राष्ट्रीय नेते दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल भारतरत्न पी.व्ही. काणे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तसेच न्यायालयाने अनेक वकिलांची आणि न्यायाधीशांची कारकीर्द पाहिली आहे, असेही ते म्हणाले.

या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती ए.एस.ओक, न्यायामुर्ती दीपंकर दत्ता, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सॉलिसिटर जनरल व्यास,  सराफ, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, तसेच न्यायालयीन कामकाजास संबधित बार कौन्सिल अध्यक्ष वकील, अभिवक्ता आदी यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: कुणाला वाचविण्यासाठी Shinde-Fadnavis हा बनाव करत आहेत? Sanjay Raut यांचा सवाल

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराज यांचे नाव देणे, ही सर्वांचीच भावना- Murlidhar Mohol

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version