Anganwadi Worker Protest, अंगणवाडीतील महिलांना राज्य सरकारचे सकारात्मक आश्वासन…

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्या पूर्तीसाठी कालपासून संप सुरु केला होता. राज्य सरकारने त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सेविकांच्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले आहे. अगंणवाडतील सेविकांच्या मानधनात १५०० रुपायांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Anganwadi Worker Protest, अंगणवाडीतील महिलांना राज्य सरकारचे सकारात्मक आश्वासन…

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्या पूर्तीसाठी कालपासून संप सुरु केला होता. राज्य सरकारने त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सेविकांच्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले आहे. अगंणवाडतील सेविकांच्या मानधनात १५०० रुपायांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाईल देखील देण्यात येणार आहे. यापुढे त्यांना पेन्शन योजनेचा (Pension Scheme) लाभही घेता येईल.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी (Anganwadi) कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला होतं. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना वेतन लागू करणे किंवा त्यांच्या मानधनात वाढ करणे, नवीन मोबाईल उपलब्ध करून देणे, पेन्शन योजना लागू करणे अश्या प्रमुख मागण्यासाठी २० फेब्रुवारीपासून मुंबईतील अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपादरम्यान राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाले होते अखेर त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

अंगणवाडीतील सेविकांबरोबर राज्यसरकारने सकारत्मक चर्चा करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केले. अंगणवाडी बंद असल्यामुळे मुलांचे नुकसान होत होते. सहा वर्षपर्यंतची लहान मुले पोषक आहारापासून दुरावली होती या गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने अंगणवाडीतील सेविकांच्या मानधनात (remuneration) १५०० रुपयांची वाढ केली आहे तसेच त्याना मोबाईल व पेंशन योजनेचा लाभ देखील घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून राऊतांची पदउतरणी ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version