पश्चिम उपनगरांतील तब्बल १५० पुलांची होणार दुरुस्ती

मुंबई महानगरपालिकेने पश्चिम उपनगरांतील तब्बल १५० पुलांची दुरुस्ती आण देखभालीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला असून या कामांसाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत.

पश्चिम उपनगरांतील तब्बल १५० पुलांची होणार दुरुस्ती

मुंबई महानगरपालिकेने पश्चिम उपनगरांतील तब्बल १५० पुलांची दुरुस्ती आण देखभालीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला असून या कामांसाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत. तब्बल १५० पुलांची दुरुस्ती-देखभालीसाठी सुमारे ८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.अंधेरील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर महानगरपालिकेच्या पूल विभागाने मुंबईतील सर्वच उड्डाणपूल आणि रेल्वेवरील पुलांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये ४०० हून अधिक लहान – मोठे पूल आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. त्यात उड्डाणपूल, रेल्वेवरील पूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग, नाल्यावरील पूल, आकाश मार्गिका यांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात महानगरपालिकेने पूर्व उपनगरांतील पुलांच्या देखभालीसाठी निविदा मागवल्या होत्या. आता महानगरपालिकेने पश्चिम उपनगरांतील पुलांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी निविदा मागवल्या आहेत. पश्चिम उपनगरांतील वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी पूर्व परिसरातील पुलांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपये, तर मालाड, गोरेगाव, अंधेरी पश्चिमेकडील पुलांच्या देखभालीसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कंत्राटदारांना ही कामे १८ महिन्यांमध्ये पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये पुलाच्या बेअरिंग बदलणे, पुलावरील तडे सिमेंट काँक्रिटने भरणे, दुभाजकांची दुरुस्ती, रंगकाम, स्टील पट्ट्या टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत एकूण ४४९ पूल आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक पुलांची दुरुस्ती, डागडुजी करणे, अशा काही सूचना करण्यात आल्या आहेत. आयआयटीच्या सूचनेनुसार, शहरातील १५ पुलांची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.यासाठी पालिका ४२ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर आता पश्चिम उपनगरातील १५० हून अधिक पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी गुरुवारी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदारास वर्क ऑर्डर देण्यात येईल. या पुलांची दुरुस्ती पावसाळ्यासह १५ महिने १८ महिने व २४ महिन्यांत पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक असेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे शासनाने ‘खड्डे आपल्या दारी’ उपक्रम सुरू करावा , मनोज घरत

वर्षा निवासस्थानी राज ठाकरे CM शिंदेंच्या भेटीला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version