मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकात बेवारस बॅगमधून सापडले तब्बल २० लाख रुपये; प्रवाशाचा शोध सुरु

मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकात बेवारस बॅगमधून सापडले तब्बल २० लाख रुपये; प्रवाशाचा शोध सुरु

दररोज मुंबई (Mumbai) सारख्या अतिशय गर्दीच्या भागात लाखो लोक मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करतात. लोकल ट्रेन म्हंटल तर नेहमीचं वर्दळीचं ठिकाण. अतिशय गर्दीच्या या भागात विविध ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने खास यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस, लोहमार्ग पोलीस, रेल्वे पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा प्रवाशांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. वेळोवेळी प्रवाशांना सुरक्षेबाबत विशेष सूचना केल्या जातात.

रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्याद्वारे सावध राहण्यासाठी संबोधित केले जाते. त्यात बेवारस वस्तूंपासून दूर राहा, बेवारस वस्तुंना स्पर्श करू नका यांसारख्या सूचना दिल्या जातात. अश्या विविध सूचना यंत्रणेकडून वेळोवेळी जाहीर केल्या जात असतानाही कसारा स्थानकादरम्यान धावणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये एक बेवारस बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये तब्बल २० लाख रुपयांची रोकड सापडली आहे. लोकलमधील काही प्रवाशांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्या बॅगला पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी बॅग उघडून पाहताच त्यात २० लाख रुपयांची कॅश असल्याचे आढळून आले आहे.

मुंबईतील सीएसएमटी स्थानकाकडून (CSMT Railway Station) कसारा स्थानकाकडे (Kasara Railway Station) निघालेली मुंबई लोकल कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ११ वाजता पोहचली. त्यावेळी लोकलमधील प्रवाशांनी ती बॅग पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे दिली असता बॅग पैशांनी भरलेली असून २० लाख इतकी किंमत होती. या बॅगमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे सात बंडल्स आहेत. ही बॅग Reebok कंपनीची आहे आणि त्यात एक औषधांचा बॉक्स सुद्धा सापडला आहे. लोकल प्रवाशांना ही बेवारस बॅग आसनगाव रेल्वे स्थानकात सापडली. कल्याण जीआरपी पोलिसांनी पंचनाम्याद्वारे ही बॅग जप्त केली आहे. त्याचबरोबर बॅगेच्या मूळ मालकाचा शोध सुरु आहे. ही बॅग कोणाची आहे, याचा तपास सध्या आमच्या यंत्रणांकडून करण्यात येत आहे, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता मिळणार कधी? Aditi Tatkare यांनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis on Koli Bhavan: आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूने खंबीरपणे उभे, Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version